सोनई येथे ऊस तोडणी मजूर यांनी संत भगवान बाबा व वामन भाऊ यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी

सोनई येथे ऊस तोडणी मजूर यांनी संत भगवान बाबा व वामन भाऊ यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी

वार्ताहर अशोक आव्हाड   खरवंडी कासार :मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई येथे श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांची संयुक्त पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली हा पुण्यतिथी सोहळा ऊसतोड कामगार व मुकादम गेली १८ वर्षापासून करत आहेत यावेळी सकाळी प्रथम भगवान बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमा बैलगाडीमध्ये ठेवून महिला डोक्यावरती कलश घेऊन डीजे व ढोल ताशाच्या गजरामध्ये पुरुष वर्ग लेझीम खेळत ही दिंडी प्रदक्षिणा कारखान्या जवळील शेतकी ऑफिस या पर्यंत गेली त्यानंतर साल सिद्धेश्वर संस्थांचेनचे स्वामी विवेकानंद शास्त्री यांना वाजत गाजत आणण्यात आले .सालसिद्धेश्वर संस्थांनचे मठाधिपती स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे सुमधुर हरिकीर्तन झाले या कीर्तनावेळी कारखान्यावरील हजारोच्या संख्येने ऊसतोड मजूर व मुकादम या कीर्तनासाठी उपस्थित होते.संपूर्ण ऊस तोड मजूर प्रत्येक वर्षी भगवान बाबा व वामन भाऊ महाराज यांची पुण्यतिथी उसाच्या फडात करतात
यामध्ये सर्व ऊस तोडणी कामगार व मुकादम हे पाथर्डी तालुक्यातील असून हे प्रत्येक वर्षी ही पुण्यतिथी साजरी करतात
आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला
अगदी आनंदी वातावरणामध्ये या ऊसतोड मजुरांनी हि पुण्यतिथी साजरी केली या पुण्यतिथीच्या संपूर्ण खर्च ऊसतोड मजूर व मुकादम हे स्वतःच्या वर्गणी मधून करतात
या पुण्यतिथी सोहळ्यासाठी विठ्ठलराव खेडकर, दशरथ पालवे, विठ्ठल शिरसाट, पोपट पालवे ,कचरू पालवे, संतोष बडे ,रामनाथ पालवे, बाबासाहेब पालवे , राजेंद्र खेडकर ,संजय पालवे, संतोष पालवे, कैलास नाना पालवे, बाबासाहेब पालवे, सखाराम ढाकणे, पिराजी कीर्तने, भागवत ढाकणे आदींनी या पुण्यतिथी सोहळ्यासाठी कष्ट घेऊन हा सोहळा पार पडला

Leave a Comment