या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या घोषणेपासून विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. हा चुनावी जुमला आहे, असं सांगण्यात येत होतं, पण आम्ही घोषणा केल्यानंतर एकाच महिन्यात अंमलबजावणी करुन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले आहेत. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.